पुनर्विकास संबंधी प्रश्न

आम्ही दोन भाडेकरू पगडीने चेंबूर गावठाण मुंबई इथे १९४७ पासून राहात होतो. २०१९ ह्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने आमची दोन माळ्याची इमारत कलम३५४ अन्वये पाडली आहे. आता सदर रिकाम्या जागेचे क्षेत्रफळ साधारण ३६० चौ.मी. आहे. आम्हां दोन्ही भाडेकरूच्या जागेचे क्षेत्रफळ अनुक्रमे ८० चौ.फूट आणि १७० चौ.फूट होते. पुनर्विकासात आम्हांला किती क्षेत्रफळ जागेची सदनिका आम्हांला मिळायला हवी आणि कॉर्पस फंड किती मिळण्यास आम्ही पात्र आहोत ह्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.